नगर : पुढारी वृत्तसेवा
वडारवाडी येथे राजेंद्र शिवाजी दिवटे याच्या घरात जुगार खेळणार्या 11 जणांना पोलिसांनी 5 जून रोजी अटक केली. भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून जुगार साहित्यासह 2 लाख 50 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आदिनाथ दगडू धिरडे (वय 45), राजेंद्र शिवाजी दिवटे (वय 62, दोघे रा.सिटीझन कॉलनी, वडारवाडी, भिंगार), शिवाजी बादशाह निस्ताने (वय 52, रा. पाटील गल्ली, भिंगार), प्रकाश गोविंद वराडे (वय 63, रा. सौरभनगर, भिंगार), हरिशचंद्र मारुती नागपुरे (वय 65 रा. लक्ष्मीनगर),
ताराचंद मारुती नागपुरे (वय 64, रा. आलमगीर, भिंगार), अशोक केशव माने (वय 56, रा. आलमगीर, भिंगार), मनोज यशवंत धंडारे (वय 42, रा. व्दारकाधीश कॉलनी, भिंगार), भास्कर आसाराम जाधव (42, रा. महेशनगर, बाराबाभळी), सय्यद मोहम्मद युसूफ (54, रा. बाराबाभळी), सोमनाथ दिलीप आहेर (36, रा. सौरभ नगर, भिंगार) अशी त्या 11 जणांची नावे आहेत.
सिटीझन कॉलनी, वडारवाडी येथे राजेंद्र शिवाजी दिवटे याच्या राहत्या घरात वरच्या मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून 11 जुगार्यांना रंगेहाथ पकडले.
जुगाराचे साहित्य, 14 हजार 100 रुपये रोख, 41 हजार किंमतीचे मोबाईल, 1 लाख 95 हजार किंमतीच्या मोटार सायकल असा एकूण 2 लाख 50 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस नाईक भानुदास खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोलिस नाईक भानुदास खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल राहुल द्वारके यांच्या पथकाने केली.
हेही वाचा