नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे अंतर्गत लेखापाल व तज्ज्ञ सल्लागार सीए शुभम सुभाष मंत्री (रा. नाशिक) यांना विश्वस्त व माध्यान्ह पूजक सत्यप्रिय शुक्ल यांनी शिवीगाळ करत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार नाशिक येथील काळाराम मंदिराचे विश्वस्त असलेले सीए शुभम सुभाष मंत्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टवर तज्ज्ञ सल्लागार अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी (दि. 4) दुपारी 2.30 च्या सुमारास ते ट्रस्टच्या कार्यालयात येथे लेखापरीक्षणासंदर्भात आले असता तेथे बसलेले मंदिराचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या ऑडिट रिपोर्टमधील गैरव्यवहाराच्या बाबत हुज्जत घालत गच्ची पकडून हाताने माराहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. तसेच शुक्ल यांच्याकडून यापूर्वीदेखील पुरोहितांना मारहाणीच्या घटना घडललेल्या आहेत. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.