नगर : साकूर, बोटा गावांत चोरट्यांचा धुमाकूळ

नगर : साकूर, बोटा गावांत चोरट्यांचा धुमाकूळ
Published on
Updated on

बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जीवन खिलारी यांचे चार टेबल व बोटा परिसरातील गोपाळ शेळके यांचे बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार (दि. 28) जून रोजी रात्री साकूर येथील जीवन गोरक्षनाथ खिलारी यांचे 20 हजार रुपये किमतीचे चार टेबल चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्याच बरोबर बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी फाटा या ठिकाणी असलेले गोपाळ मुरलीधर शेळके हे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराला कुलूप लावून गायांच्या शेडमध्ये गेले होते. बुधवारी सकाळी आले असता, तर समोर त्यांना दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी सामानाची उचकापाचक करून देवघरातील 43 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला होता.

घटनेची माहिती समजताच पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news