या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच : संजय राऊत | पुढारी

या ना त्या कारणाने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सरकारसमोर  कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकत्र मिळून राज्य पुढे न्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या शुभेच्छा आहेत” असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी मार्गी लावाव्यात. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या समस्या याकडे लक्ष द्यावे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकत्र मिळून राज्य पुढे न्यावं. आम्ही राजकारण करणार नाही.  सरकारसमोर  कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही, असेही ते म्हणाले.

राजकारण हे सोयीनुसार आणि संधीनुसार केले जाते- संजय राऊत

राजकारण हे सोयीनूसार आणि संधीनुसार केले जाते. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचे राईट हॅंड आहेत. भाजपने  एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले अस  मी म्हणणार नाही.  शिवसेनेतील एका मोठ्या गटाने भाजपबरोबर सरकार उभा केले आहे. आणि या ना त्या कारणाने मुख्यमंत्री पद शिवसेनेकडेच राहिले आहे. असे म्हणतं त्यांनी विरोधकांना  टोला मारला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ काल घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद आपल्याकडे न घेता एकनाथ शिंदे यांना दिले. यासंबधीत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, फडणवीसांनी अडीच वर्षापुर्वीच मोठं मन दाखवायला हवं होत. त्यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसतेय, असं म्हणतं त्यांनी फडणवीसांना खोचक टोला मारला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button