नगर : लाच घेताना दारूबंदी अधिकार्‍यांना पकडले

नगर : लाच घेताना दारूबंदी अधिकार्‍यांना पकडले
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : दारू विक्री व वाहतूक चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 35 हजारांची रक्कम स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम श्रेणी अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (दि. 29) रोजी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ते कुंभारी रस्त्यावर एका किराणा दुकानाच्या मागे ही कारवाई करण्यात आली आहे. नंदू चिंधू परते (दुय्यम निरीक्षक) आणि राजेंद्र भास्कर कदम (सहा. दुय्यम निरीक्षक) कोपरगाव विभाग बाभळेश्वर असे दोघा लाचखोर अधिकार्‍यांची नावे आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचा दारू विक्रीचा व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दि.27 जून 2022 रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम (वय 46) याने मागील 11 महिन्याचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारताना पकडण्यात आले.

सदरची कारवाई लाचलुचपत नाशिक परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पो. हवा- डोंगरे यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news