अहमदनगर
नेवासा: गोदावरी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
नेवासा : तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील श्रीकांत गणेश शिंदे (वय 18) या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरेगाव गंगा गोदावरी नदीपात्रात आंघोळीसाठी मित्रांसमवेत पोहायला गेला होता; मात्र पोहताना नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
खबर अंकुश शिंदे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरा, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा घटनास्थळी पोहोचलेे. युवकांनी बराच वेळ शोध घेतला. त्यानंतर शहर टाकळी (ता. शेवगाव) येथील गोताखोर पथकास पाचारण केले. त्यांनी ऑक्सिजन सिलिंडरच्या साह्याने नदीपात्राच्या तळाशी त्याचा मृतदेह आढळून आला.