मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा : आ : मोनिका राजळे

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा : आ : मोनिका राजळे

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना देशभर राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी तालुका भारतीय जनता युवा मोर्चच्या वतीने मोदी 9 उपक्रमांतर्गत आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बाईक रॅली समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा प्रभारी अंकित संचेती, अशोक चोरमले, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, अजय भंडारी, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळक, अमोल गर्जे, राहुल राजळे, कृष्णा राजळे, कुशल भापसे, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, संचालक पाडुरंग लाड, मधुकर देशमुख, किरण राठोड, नारायण पालवे, बाळासाहेब गोल्हार, चारूदत्त वाघ, नामदेव लबडे यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मोदी 9 उपक्रमाच्या निमित्ताने भाजपा पदाधिकार्‍यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कालावधीतील योजनांचा प्रचार व प्रसार करून जनते मध्ये जागृती करावी. प्रत्येक बुथवर किमान पन्नास नवीन मतदार नोंदणी करावी. प्रत्येकाने सरल व नमो अ‍ॅप डाऊनलोड करून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

दादापाटील राजळे महाविद्यालय येथून बाईक रॅलीला प्रारंभ झाला. हजारो बाईक सह रॅली कासार पिंपळगाव, हनुमानटाकळी, चितळी, पाडळी, साकेगाव, डांगेवाडी या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाथर्डी शहरात रॅली दाखल झाल्यानंतर कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. लोकनेते आप्पासाहेब राजळे सभागृहात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी रॅलीत गावोगावी व पाथर्डी शहरात 9 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news