शेवगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींचे मतदार अंतिम !

शेवगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींचे मतदार अंतिम !

शेवगाव : तालुक्यातील मुदत संपलेल्या 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 53 हजार 761 मतदार अंतिम झाले आहेत. आणखी दोन ग्रामपंचायतीच्या अंतिम मतदारयादीचा कार्यक्रम सुरू असून, पुढील महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तालुक्यात मुदत संपलेल्या आव्हाणे बुद्रुक, बर्‍हाणपूर, सामनगाव, लोळेगाव, वडुले बुद्रुक, एरंडगाव भागवत, थाटे, लाखेफळ, लाडजळगाव, दिवटे, मुंगी, वडुले खुर्द, वरूर बुद्रुक, भगूर, गोळेगाव, मडके, खडके, बालमटाकळी, बोधेगाव, कर्‍हेटाकळी, हिंगणगाव-ने, ढोरसडे अंत्रे, शहरटाकळी, देवटाकळी, खरडगाव या 25 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार याद्या अंतिम झाल्या आहेत.

संबंधित बातम्या :

तर, एरंडगाव समसुद व शेकटे खुर्द या दोन ग्रामपंचायतीच्या मतदार याद्याचा कार्यक्रम चालू आहे. 27 सप्टेंबर रोजी त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या 25 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 53 हजार 761 मतदार अंतिम झाले आहेत. यामध्ये 28 हजार 399 पुरूष, तर 25 हजार 542 स्त्रिया आहेत. सर्वांत जास्त बोधेगाव येथे 6 प्रभागांत 17 जागांसाठी 6 हजार 882 मतदार, तर सर्वांत कमी बर्‍हाणपूर येथे 3 प्रभागांत 7 जागांसाठी 431 मतदार आहेत. मुंगी येथे 5 प्रभागांत 15 जागांसाठी 4 हजार 840, बालमटाकळी येथे 5 प्रभागांत 13 जागांसाठी 4 हजार 473, लाडजळगाव येथे 5 प्रभागांत 13 जागांसाठी 4 हजार 401, शहरटाकळी येथे 4 प्रभागांत 11 जागांसाठी 3 हजार 538, वरूर बुद्रुक येथे 4 प्रभागांत 11 जागांसाठी 3 हजार 393 मतदार आहेत.

इतर ग्रामपंचायतींमध्ये आव्हाणे बुद्रुक 4 प्रभागांतील 11 जागांसाठी 2 हजार 620 मतदार, सामनगाव 3 प्रभागांत 9 जागांसाठी 1 हजार 608 मतदार, लोळेगाव 3 प्रभागांत 7 जागांसाठी 516 मतदार, वडुले बुद्रुक 3 प्रभागांत 9 जागांसाठी 2 हजार 471 मतदार, एरंडगाव भागवत 3 प्रभागात 9 जागांसाठी 887 मतदार, लाखेफळ 3 प्रभागांत 7 जागांसाठी 591 मतदार, थाटे 3 प्रभागांत 7 जागांसाठी 1 हजार 56 मतदार, दिवटे 3 प्रभागांत 7 जागांसाठी 762 मतदार, वडुले खुर्द 3 प्रभागांत 9 जागांसाठी 2 हजार 261 मतदार, भगूर 3 प्रभागांत 7 जागांसाठी 1 हजार 262 मतदार, गोळेगाव 3 प्रभागांत 9 जागांसाठी 1 हजार 516 मतदार, मडके 3 प्रभागांत 7 जागांसाठी 917 मतदार, खडके 3 प्रभागांत 7 जागांसाठी 758 मतदार, कर्‍हेटाकळी 3 प्रभागांत 9 जागांसाठी 1 हजार 455 मतदार, हिंगणगाव -ने 3 प्रभागांत 7 जागांसाठी 1 हजार 107 मतदार, ढोरसडे अंत्रे 3 प्रभागांत 9 जागांसाठी 1 हजार 207 मतदार, देवटाकळी 3 प्रभागांत 9 जागांसाठी 2 हजार 392 मतदार, खरडगाव 4 प्रभागांत 11 जागांसाठी 2 हजार 417 मतदार आहेत.

या ग्रामपंचायतींमध्ये सामनगाव, लाडजळगाव, वरूर बुद्रुक, मडके, हिंगणगाव-ने, ढोरसडे अंत्रे, देवटाकळी, खरडगाव येथील सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तर, बर्‍हाणपूर, लोळेगाव, थाटे, मुंगी, वडुले खुर्द, भगूर, गोळगाव, खडके, शहरटाकळी येथील सरपंच पद सर्वसाधारण स्त्री, एरंडगाव भागवत, दिवटे, बोधेगाव, कर्‍हेटाकळी येथील सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, बालमटाकळी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, लाखेफळ येथे अनुसूचित जाती स्त्री, आव्हाणे बुद्रुक येथे अनुसूचित जाती असे सरपंच पद आरक्षित आहे. दोन ग्रामपंचायतींच्या जाहीर झालेल्या मतदार याद्या कार्यक्रमातील एरंडगाव समसुद येथील सरपंच पद सर्वसाधारण स्त्री व शेकटे खुर्द येथील सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

दुष्काळामुळे निवडणुका लांबणार?
तालुक्यातील या सर्व 27 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील महिन्यात मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र, दुष्काळाची झळ वाढल्यास सदर निवडणुका लांबणीवरही पडू शकतात.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news