Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशभक्तांसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था! | पुढारी

Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशभक्तांसाठी अशी असेल पार्किंग व्यवस्था!

पुणे : आज पासून संपूर्ण राज्यात गणेशोत्सव सुरु होत आहे. उत्सवाच्या काळात पुणे शहरात वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून, वाहतूक विभागाने रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास सक्त मनाई केली आहे. यासोबतच विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लोक त्यांच्या कुटुंबासह गणेश मंडळाला भेट देत असतात, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे.

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी म्हणजेच 28 तारखेला वाहनचालकांना पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेले ठिकाण 

न्यू इंग्लिश स्कूल, शिवाजी आखाडा वाहनतळ, देसाई कॉलेज, हमालवाडा पत्र्या मारुती चौकाजवळ, गोगटे प्रशाला, एसपी कॉलेज, नदी पात्रालगत, शिवाजी मराठा हायस्कूल, नातूबाग, पेशवे पार्क सारसबाग, हरजीवन हॉस्पिटल सावरकर चौक, पाटील प्लाझा पार्कींग, मित्रमंडळ सभागृह, पर्वती ते दांडेकर पूल, दांडेकर पूल ते गणेश मळा, नीलायम पूल, विमलाबाई गरवारे हायस्कूल, आबासाहेब गरवारे कॉलेज, आपटे प्रशाला, संजीवनी मेडीकल कॉलेज, आपटे प्रशाला, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी मैदान, मराठवाडा कॉलेज, एसएसपीएमएस कॉलेज याठिकाणी पुणेकरांना वाहने पार्किंग करता येतील.

हेही वाचा : 

Good news ! कांदा उत्पादकांना मिळणार 818 कोटींचे अनुदान

सांगली : दुर्वांची पेंडी 70 रुपयांना एक

Ganeshotsav 2023 : पीएमपीकडून गणेश भक्तासाठी जादा 640 गाड्या

Back to top button