पारनेर : मेंढपाळ घरकुल प्रश्न विधानसभेत मांडू : आ. नीलेश लंके

पारनेर : मेंढपाळ घरकुल प्रश्न विधानसभेत मांडू : आ. नीलेश लंके
Published on
Updated on

पारनेर/ टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : मेंढपाळ व्यवसायात धनगर बांधवांना ऊन, वारा, पावसापासून कोणतेही संरक्षण नसते. गावाकडेही याच असुविधांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मेंढपाळांंच्या घरकुलांचा प्रश्न उपस्थित करून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली. ढवळपुरी (ता.पारनेर) येथील तीन कोटी रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच 500 मेंढपाळ बांधवांना ताडपत्र्यांचे आमदार लंके यांंच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक कटारिया होते.

आमदार लंके म्हणाले, धनगर समाजाच्या अडचणी, दुःख काय आहेत, हे जवळून पाहिले आहे. आठ-आठ महिने धनगर बांधव गावापासून दूर जाऊन मेंढपाळ व्यवसाय करतात. अनेकदा धनगर बांधवाचा फोन येतो, आमची बकरे चरत असताना शेतकर्‍याने दोन कोकरू उचलून नेले, मारहाण केली. तुम्ही पोलिसांना फोन करा, सरपंचाला फोन करण्याचे साकडे घातले जाते. त्याच वेळी आपण संबंधित गावातील सरपंचाचा शोध घेऊन मदत करण्याबाबत व्यवस्था करतो.

ढवळपुरीमधील काही रस्त्यांची कामे शेतपाणंदमधून मार्गी लावण्यात आली आहेत. उर्वरित रस्त्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांना सायकल वाटप करतानाही भागाजी गावडे व सुखदेव चितळकर यांनी दोन स्वतंत्र याद्या देत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सायकलींचा लाभ मिळवून दिला. दिवाळीनिमित्त अजूनही गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात येईल, असे आश्वसन आमदार लंके यांनी यावेळी दिले.

यावेळी बाबाजी तरटे, सुदाम पवार, ठकाराम लंके, अ‍ॅड. राहुल झावरे, दत्ता कोरडे, प्रा. संजय लाकुडझोडे, अरूण पवार, बबन आडसूळ, विजय सासवडे, विकास भागवत, संजय काळे, प्रसाद नवले, विकास शेटे, सरपंच नंदा गावडे, भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, रमेश केदारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news