अहमदनगर तालुक्यातील शाळेजवळ रोडरोमिओंंचा धुमाकूळ

अहमदनगर तालुक्यातील शाळेजवळ रोडरोमिओंंचा धुमाकूळ

चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांबाहेर रोडरोमिओनींं धुमाकूळ घातला असून, यातून अनेक विद्यार्थिंनींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. चिचोंडी पाटील परिसरातील रोडरोमिओंचा मोठा त्रास असून, याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा पालक वर्गामधून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थिंनींबाबत आत्मसरंक्षणाचे धडे द्यावेत, तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

अनेक शाळा-महाविद्यालयांबाहेर रस्त्यावर जोराजोरात गाड्या उडवून फिरणारे रोडरोमिओ, शाळा, महाविद्यालयांचे गेट, बसस्थानकावर गर्दी करणार्‍यांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सायलेन्सरला फटाक्याचे आवाज लावून वेगात गाडी पळविल्याने अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लावण्यासाठी नगर तालुक्यात पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शाळा-महाविद्यालयांसमोर दुचाक्या वेगाने पळवणे, वेगवेगळ्या आवाजात हॉर्न वाजविणे, शाळा, महाविद्यालयांबाहेर विद्यार्थिनींची छेडछाड करणे आदी प्रकारात वाढ होत आहे. याचा नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पालकांमध्ये नाराजी

रोडरोमिओंबाबत चिचोंडी पाटीलच्या काही पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर निर्भया पथकाकडून मुलींना एक दिवसाचा कॅम्प घेऊन आत्मसंरक्षणाचे धडे दिले. मात्र, त्यानंतर पोलिसांकडून कुठल्याही ठोस उपाययोजना न झाल्याने पालकांत नाराजी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news