अहमदनगर : जिल्हाधिकार्‍यांसह 160 जणांना अवयवदानाची इच्छा | पुढारी

अहमदनगर : जिल्हाधिकार्‍यांसह 160 जणांना अवयवदानाची इच्छा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यासह 160 जणांनी अवयवदान करण्याची इच्छ व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी संमतीपत्र अर्ज घेतले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला. 160 कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी झाली असून, 23 जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबीरात मधुमेह, थॉयराईड, रक्तदाब,

कोलेस्ट्रॉल, रक्त, लघवीची तपासणी करण्यात आली. 97 कर्मचार्‍यांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजल्या जाते. समाजाचे आपलेही काही देणे लागते ही भावना अंगी रुजवून अधिकारी, कर्मचार्‍यांनी स्वेच्छेने रक्तदान करण्याबरोबरच मरणोत्तर आपले अवयव दान करून समाजातील गरजूंना नवीन आयुष्य मिळावे यासाठी अवयवदानाचा संकल्प करून संमतीपत्र देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यासह 160 जणांनी अवयवदान करण्यासाठी संमतपीपत्र अर्ज घेतले. आहेत. या अर्जावर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची सही झाल्यानंतर कोण कोण अवयवदान करणार हे समजणार आहे.

आरोग्य शिबीर आणि रक्तदान कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी नायब तहसीलदार राजेंद्रकुमार पाटील, नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गंगाराम तळपाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, नायब तहसीलदार योगेश कुलकर्णी, रोहयो समन्वयक विकास घिगे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

श्रीरामपूर : अतिवृष्टीच्या नुकसान यादीतून नावे वगळली

पिंपरी : ठेकेदार, विकसकांचं चांगभलं

जावयांना सामुदायिक धोंडे जेवण; माहिजळगावमध्ये अनोखा उपक्रम

Back to top button