पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करा : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करा :  आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन देताना शेवगाव, पाथर्डी भाजप विधानसभा प्रमुख नारायण पालवे उपस्थित होते. आमदार राजळेंनी निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रातील इतर दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याप्रमाणे पाथर्डी व शेवगाव तालुका दुष्काळी जाहीर होणे गरजेचे आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने नगर जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. विशेषत: पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये अत्यअल्प पाऊस झालेला आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील खरिपाची पिके वाया गेली असून, रब्बी हंगामाच्या पेरण्याही होवू शकल्या नाही. दुष्काळी परिस्थितीच्या निकषात बसत असूनही संबंधीत कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी उपाययोजनापासून वंचित राहण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे. या तालुक्यांतील सर्व बंधारे, पाझर तलाव, के.टी वेअर बंधारे, विहीरी कोरड्यात पडत आहेत.

संबंधित बातम्या :

यामुळे शासकीय धोरणात्मक निकषांची, केंद्र शासन संहीता, निर्देशांक कृषी व महसूल विभागाचे सत्यापण पाहणी, या सर्व बाबींचा फेरविचार होवून दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून, जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्यमानाची तुट उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष व वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती, या सर्व घटकांचा अभ्यास करावा व कृषी, महसूल व मदत पुर्नवसन विभागाने या संदर्भात बैठक घेवून, पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपाची पिके पावसा अभावी जळून गेली. रब्बी पिकांची पेरणी नाही. सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण आहे. त्यामुळे या तालुक्यांचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करून दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. याबाबत लवकरच फेरआढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीसांनी दिले आहे.
                                                           -मोनिका राजळे, आमदार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news