संगमनेरात वकिलाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेरात वकिलाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ कारणावरुन राग धरुन संगमनेरातील एका ज्येष्ठ वकिलाला सहा जणांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून बेदम मारहाण केल्यामुळे वकील गंभीररीत्या जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला रात्री पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील विद्यानगर भागात संगमनेरमधील ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश खिडके हे दुपारच्यावेळी आपल्या घरात असताना तेजस विजय खर्डे या त्याच भागात राहणार्‍या तरुणाने त्यांच्या घराच्या दारापुढे दुचाकी उभी केली.

त्यावर संबंधित विधिज्ञांनी घरात येण्या-जाण्याचा रस्ता असल्याने दारात गाडी लावू नकोस, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने त्या वकिलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातून निखील शिंदे, चिव्या कळंबे (दोघेही रा. शिवाजीनगर) व इतर अनोळखी तीन इसमांना घटनास्थळी बोलावून घेतले.

या सर्व सहा जणांनी वकील सुरेश खिडके यांच्या घरात घुसून त्यांना फ्री-स्टाईल लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यांना उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी वकील सुरेश खिडके यांचा मुलगा ब्रह्मरुप सुरेश खिडके यांनी संगमनेर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार तेजस खर्डे याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news