नाशिक : बोगस डॉक्टरांना कोरोना पावला!

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिका : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जवळपास दीडशे अनधिकृत डॉक्टर नागरिकांवर उपचार करीत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला या अनधिकृत डॉक्टरांबाबत अहवाल तयार करण्याची औपचारिकता केली जात असते. मात्र, कोरोना महामारीमुळे आरोग्य विभागाकडून कोणतीही पाहणी न झाल्यामुळे बोगस डॉक्टरांना कोरोना पावल्याचे बोलले जात आहे.

वैद्यकीय शिक्षण न घेताच केवळ अनुभवाच्या आधारावर अल्पशिक्षित व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय चालवत असतात. या डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे बर्‍याचदा चुकीचे उपचार होऊन लोकांच्या जीवावर बेतते. नागरिकांनाही परिसरात डॉक्टर नसल्यामुळे याच अनधिकृत डॉक्टरांचा आधार वाटत असतो. मात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या अभावामुळे या अनधिकृत डॉक्टरांकडून चुकीची औषधे दिली जातात. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून अशा अनधिकृत डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यांना नोटिसा देऊन व्यवसाय बंद करण्यास सांगितले जाते. त्यानंतरही ऐकले नाही, तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाते. तालुका वैद्यकीय अधिकारी ही कारवाई करून त्याचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवत असतात. मात्र, कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून आरोग्य विभागाने या बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याची मोहीम थांबल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडे कोणतीही नवीन माहिती प्राप्त झालेली नाही. कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे या महामारीच्या प्रतिबंधासाठी काम करीत असल्याने ही मोहीम थांबल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी 129 डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बोगस डॉक्टरांना दिल्या होत्या. त्यातील 20 जणांनी व्यवसाय बंद केल्याचे कळवले आहे. दरम्यान, 129 जणांना नोटिसा दिल्यानंतर त्याचे पुढे काय झाले, हे बघण्यास आरोग्य विभागास वेळच मिळाला नाही.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news