नगर : पुढारी वृत्तसेवा
जामखेड तालुक्यातील बसरवाडी, शिऊर येथील लहान मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला दि. 18 मे रोजी बसरवाडी येथून अटक केली आहे. आरोपी गेल्या दहा वर्षांपासून फरार होता.
दादा महादेव मुटके असे या आरोपीचे नाव आहे.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावरून फिर्यादी रामदास सुखदेव फाळके आणि आरोपी लक्ष्मण फाळके यांच्यात वारंवार किरकोळ वाद होत होते. मागील भांडणाच्या कारणावरून दि.11 जुलै 2012 रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपी लक्ष्मण फाळके, गौतम फाळके, नारायण फाळके, शिवदास फाळके, भरत फाळके, लखाबाई फाळके, शिवगंगा फाळके, शालन फाळके, मैना फाळके, शशिकला फाळके, दादा मुटके व जमना मुटके सर्वांनी फिर्यादीच्या पत्नी जलदाबाई यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असताना फिर्यादीची नात संगीता मध्ये आल्यानंतर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून करण्यात आला होता.
या प्रकरणात जामखेड पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान आरोपी महादेव मुटके हा बसरवाडी येथे ओळख लपवून गावातील बाबू केकाण नामक व्यक्तीकडे घराच्या बांधकामासाठी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ठावठिकाण्याची माहिती घेऊन त्यास दि. 18 मे रोजी शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीला जामखेड पोलिसाच्या हवाली करण्यात आले आहे.
हे ही वाचा :