अमिताभ बच्चन, अजय देवगण, शाहरुख आणि रणवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमिताभ बच्चन, अजय देवगण, शाहरुख आणि रणवीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Published on

पटना : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडचे स्टार्स बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे अडचणीत सापडले आहेत. वास्तविक या सर्व कलाकारांना पान मसाला आणि गुटख्याचा प्रचार करणे महागात पडले असून बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या सर्व स्टार्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात कलम ४६७, ४६८, ४३९ आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी या चारही स्टार्सवर पैशाच्या लोभापोटी स्टारडमचा गैरवापर केल्याचा आरोपही आरोपपत्रात करण्यात आला आहे. वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी २७ मे रोजी होणार आहे.

हाश्मीने गुन्हा का दाखल केला?

तमन्ना हाश्मी म्हणाल्या की, हे बॉलिवूडचे स्टार्स त्यांच्या लोकप्रियतेचा गैरवापर करत आहेत. या सगळ्यांना लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोट्यवधी लोक फॉलो करतात. अशा परिस्थितीत हे स्टार्स लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणा-या पदार्थांची जाहीरात करून ते दिशाभूल करत आहेत. समाजावर प्रभाव टाकणा-या चित्रपट स्टार्सकडून पान मसाला, गुटखा आदी आरोग्यास हानीकारक असणा-या पदार्थांच्या जाहिरात केल्याने मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो, असे त्यांनी म्हणणे मांडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news