Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण विजेता साबळे श्रीसाई चरणी लिन

Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्ण विजेता साबळे श्रीसाई चरणी लिन

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये पहिले सुवर्ण पद जिंकणारा भारतीय खेळाडू अविनाश साबळे याने आज श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आदी उपस्थित होते.

29 वर्षीय अविनाश साबळे यांनी चीन मधील हांगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:19.50 सेकंदात शर्यत पूर्ण करुन राष्ट्रीय विक्रम केला. त्याने सन 2018 च्या जकार्ता गेम्समध्ये इराणच्या होसेन केहानीने बनवलेला 8 मिनिटे व 22.79 सेकंदांचा मागील आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने 5 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदकही मिळविले आहे.

अविनाश साबळे महाराष्ट्रातील बीड येथील रहिवाशी आहे. वयाच्या 6 व्या वर्षापासून धावण्याचा सराव करतो. 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. अविनाश यांनी वडीलांसह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्याधिकारी पी. शिवा शंकर यांनी सत्कार केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news