राहुरीत महामार्गावर अतिक्रमण; अपघाताचे प्रमाणात वाढ

राहुरीत महामार्गावर अतिक्रमण; अपघाताचे प्रमाणात वाढ

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण तसेच अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहनचालक व पायी जाणार्‍यांची चांगलीच तारांबळ होत आहे. बारागाव नांदूर फाटा ते खरेदी विक्री संघापर्यंत नगर- मनमाड रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. नगर- मनमाड रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. या महामार्गावर वाहनांची रेलचेल सुरूच असते.

त्यातच अवजड वाहनांना शहरातून वाट काढताना अपघाताच्या घटना घडतात. रस्त्याच्याकडेला काहींनी अतिक्रमण करीत अडसर निर्माण केला आहे. तर अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांची वाहनेही रस्त्यामध्येच अस्ताव्यस्त लावलेली असतात. तसेच काहींनी रस्त्याच्याकडेला पक्के अतिक्रमण केले असल्याने त्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

राहुरी येथील नगर- मनमाड रस्ता हा शिर्डी व शनिशिंगणापूर येथील भाविकांच्या वाहनांमुळे नेहमीच वर्दळीचा राहिला आहे. तसेच रस्त्यावरील वाहन चालकांना शहरातून प्रवास करताना होणारी गर्दी पाहता अपघातांना सामोरे जावे लागते. नुकतेच बसस्थानकासमोरील मल्हारवाडी चौकामध्ये अपघातामध्ये एका वयोवृद्धाला ट्रकची धडक बसली.

वयोवृद्धाच्या पाय चाकाखाली सापडल्याने या अपघातामध्ये पाय गमवावे लागले. तरीही परिसरातील अतिक्रमण व रस्त्याला अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न कमी झाला नसल्याचे दुर्देवी चित्र आहे. राहुरी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, तसेच अतिक्रमण धारकांवर कठोरात कठोर करावाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य, ग्रामस्थ, प्रवासी होत आहे.

रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची मागणी

रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी, फळविक्रते, चारचाकी वाहनांसह, अवैध वाहतूक करणारे ट्रक्सी धारक, दुकानदारांनी दुकानासमोर केलेल्या शेडचे अतिक्रमण यांनी अडविलेला नगर- मनमाड रस्ताचा श्वास लवकरात लवकर मोकळा करावा, अशी मागणी केली जाते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news