पाथर्डीतून बांधकामाच्या 950 किलो स्टीलची चोरी | पुढारी

पाथर्डीतून बांधकामाच्या 950 किलो स्टीलची चोरी

पाथर्डी तालुका (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : घर बांधकामासाठी आणलेले सुमारे 950 किलो स्टील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील खंडोबामाळ येथे घडली. दरम्यान, चोरीच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पाथर्डी शहरातील खंडोबामाळ येथे अक्षय बुवासाहेब खेडकर यांनी नवीन घराच्या बांधकामासाठी दोन दिवसांपूर्वी स्टील आणून ठेवले होते. तसेच बांधकामासाठी लागणारे विटा, वाळू, खडी, असे साहित्य घराचे शेजारी चंपालाल चंदनमल गांधी यांच्या मोकळ्या जागेत टाकले होते.

अक्षय हे 25 जून रोजी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी तेथे गांधींच्या मोकळ्या जागी घराचे बांधकामासाठी टाकलेले स्टील त्यांना दिसले नाही. त्यामुळे आपल्या स्टीलची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी चोरीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या फिर्यादीवरून सुमारे 950 किलो लोखंड चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.

हेही वाचा

पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची रस्त्यावर लावलेल्या स्टॉलकडे डोळेझाक

संगमनेर : 43 जनावरांची कत्तलीपासून मुक्तता; पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई

Back to top button