

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास २५ एकर ऊस क्षेत्रावरील वीजवाहक तारा तुटल्या. यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात जवळपास १५ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांचे अंदाजे २२ ते २५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बापूसाहेब संपत कणसे, महादेव शिवराम तांबे, विलास मल्हारी खेडकर, कांताबाई आदिक तांबे, अशोक बाबा झिटे या पाच शेतकऱ्यांचा शेतात आग लागली. एकूण २५ एकर क्षेत्रावरील उसाला आग लागलीय. आग विझवण्यासाठी आजूबाजूचे ग्रामस्थ व शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत.
मोठ्या कष्टाने वाढवलेला ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.