शिर्डी : साईबाबांच्या चरणी 47 कोटींचे दान

शिर्डी : साईबाबांच्या चरणी 47 कोटींचे दान

शिर्डी(अहमदनगर);  पुढारी वृत्तसेवा : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 25 एप्रिल ते 15 जून दरम्यान सुमारे 47 कोटी 78 लाख 83 हजार 560 रूपयांचे दान साईभक्तांनी अर्पण केल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सीवा शंकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

साईबाबांच्या दर्शनासाठी या काळात शिर्डीत सुमारे 26 लाख भाविकांनी हजेरी लावली. सशुल्क दर्शन आणि आरतीद्वारे 11 कोटी 55 लाख 6 हजार 997 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. साईभक्तांच्या दानातून साईसंस्थान देशातील क्रमांक दोनचे देवस्थान बनले आहे. याच दानातून शिर्डीत भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

साईबाबांना मिळालेल्या दानामध्ये देणगी काउंटरद्वारे 25 कोटी 89 लाख 70 हजार 382, दक्षिणा पेटीतून 9 कोटी 83 लाख 32 हजार 842, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 5 कोटी 15 लाख 28 हजार 755, ऑनलाईन देणगीमधून 3 कोटी 34 लाख 44 हजार 543, चेक-डीडीद्वारे 1 कोटी 82 लाख 61 हजार 806, मनीऑर्डरद्वारे 27 लाख 37 हजार 19 रूपये आले आहेत.

1 कोटी 17 लाख 59 हजार 125 इतक्या किंमतीचे 2 किलो 193 ग्रॅम 440 मिली वजनाचे सोने आले आहे. 28 लाख 49 लाख 88 रूपयांची 52121 ग्रॅम चांदी आली आहे. तर, सशुल्क दर्शन पासद्वारे 8 कोटी 30 लाख 57 हजार 997 रूपये, सशुल्क आरती पासच्या माध्यमातून 3 कोटी 24 लाख 49 हजार रूपये प्राप्त झाले आहेत. 25 एप्रिल ते 15 जून या काळात 22 लाख 41 हजार 300 भाविकांनी साईप्रसाद भोजन घेतले. तर, दर्शन रांगेद्वारे याच काळात 21 लाख 9 हजार 523 भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

दोन हजाराच्या 12 हजार नोटा

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2 हजार रूपयांच्या नोटांबाबत घेतलेल्या निर्णयानंतर 20 मे ते 15 जूनपर्यंत साईंच्या दानात 2 हजार रूपयांच्या 12 हजार नोटा जमा झाल्या आहेत. या माध्यमातून 2 कोटी 40 लाखाचे दान मिळाले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news