अहमदनगर शहरात उद्यापासून पाणीपुरवठा विलंबाने

अहमदनगर शहरात उद्यापासून पाणीपुरवठा विलंबाने
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीकडून बाभळेश्वर-राहुरी-नगर-एमआयडीसी लाईनवर तारा ओढण्याच्या कामासाठी 33 के.व्ही. मुळा डॅम विद्युत वाहिनीवर शनिवारी (दि. 26) सकाळी 11 ते 5 पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. दरम्यान, अमृत योजनेसह शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीउपसा बंद राहणार असून, परिणामी शहरात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

महावितरण कंपनीकडून मुळा डॅम उपकेंद्र विद्युत वाहिनी शनिवारी सकाळी 11 ते 5 बंद राहणार आहे. दरम्यान, या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

त्या भागास रविवारी पाणीपुरवठा होईल. रविवारी (दि.27) रोटेशननुसार पाणीवाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टी. व्ही. सेंटर परिसर, म्युनिसिपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायकनगर भागात पाणीपुरवठा होणार नाही. या भागाला पाणीपुरवठा रविवारऐवजी सोमवारी (दि. 28) करण्यात येईल.

सोमवारी पाणीपुरवठा होऊ न शकणार्‍या सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या परिसराला मंगळवारी (दि.29) पाणीपुरवठा करण्यात येईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news