नगर : न्यायालयामध्ये पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

नगर न्यायालय आवारात पेटवून घेतलेल्या तरुणाचा पुणे येथे उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. ऋषिकेश विठ्ठल ढवण (वय 18, रा. बाभूळगाव, राहुरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर बाभूळगावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह दंगल नियंत्रण पथक गावामध्ये तैनात करण्यात आले होते.

रात्री उशिरा तरूणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे समाजामध्ये आमची बदनामी झाली असे सांगत ढवणने नगर येथे न्यायालयात पेटवून घेतले होते.

दरम्यान, ढवण यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारत लहानू थोरात, आण्णा तबाजी थोरात, उज्ज्वला शरद थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण निवळले. परंतु, रात्री उशिरापर्यंत बाभूळगाव परिसरामध्ये शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.

हे हे वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news