देवेंद्र फडणवीस : 'विद्यापीठे ही युवा सेनेचा अड्डा करण्याचा प्रयत्न; आमचा याला विरोध' | पुढारी

देवेंद्र फडणवीस : 'विद्यापीठे ही युवा सेनेचा अड्डा करण्याचा प्रयत्न; आमचा याला विरोध'

नगर; पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील सरकार हे पळपुटे सरकार आहे, भयभीत सरकार आहे. विद्यापीठांचा बाजार यांनी मांडला आहे. विद्यापीठांच्या संपत्तीवर यांचा डोळा आहे. अलीकडच्या काळात विद्यापीठे ही युवा सेनेचा अड्डा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला आमचा विरोध आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज नगर शहरामध्ये आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, राम शिंदे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नगरचे भाजप जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या निवास्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात जो वाद सुरू आहे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र पाठवले होते. या पत्रातील भाषा अत्यंत अशोभनीय आहे. राज्यपालांनी या पत्राला उत्तर देताना अत्यंत संयमी भाषा वापरली आहे. संविधान पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे, याचे भान ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button