Congress new President : ‘काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नव्या वर्षात मिळणार; राहुल यांची पद स्वीकारण्याची तयारी’

file photo
file photo

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस पक्षाला नवीन वर्षात पूर्णवेळ अध्‍यक्ष मिळेल. सप्‍टेंबर २०२२पर्यंत अध्‍यक्षपदासाठी ( Congress new President ) निवडणूक होणार असून यासाठी पक्षाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती पक्षातंर्ग निवडणूक प्राधिकरणाचे अध्‍यक्ष मधुसूदन मिस्‍त्री यांनी दिली.

अध्‍यक्ष निवडीबाबत बोलताना मधुसूदन मिस्‍त्री म्‍हणाले, सध्‍या सोनिया गांधी या पक्षाच्‍या हंगामी अध्‍यक्ष आहेत. पक्षाने ऑक्‍टोबर महिन्‍यातच ऑगस्‍ट व सप्‍टेंबर २०२२मध्‍ये पक्षाध्‍यक्ष पदासाठी निवडणूक होईल, असे स्‍पष्‍ट केले होते.

सदस्‍यता अभियान हे २१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल. यानंतर पक्ष अध्‍यक्ष निवड ही सप्‍टेंबर महिन्‍यात होईल. काँग्रेस कार्यकारणी समितीच्‍या निवडणुकीबाबत बोलताना ते म्‍हणाले की, अध्‍यक्ष निवडीसाठी पक्षाचे अधिवेशन बोलवले जाईल. यावेळी काँग्रेस कार्यसमिती निवडणुकावर निर्णय होईल.

Congress new President : सध्‍या तरी अध्‍यक्षांच्‍या नावावर भाष्‍य  नाही

काँग्रेसचे नवे अध्‍यक्ष कोण असणार ? यावर आताच भाष्‍य करता येणार नाही. त्‍यामुळे मी आता तरी कोणाचेही नाव घेणार नाही. या निवडणुकीत किती जण सहभागी होतील यावरच ते ठरले, असेही मधुसूमन यांनी स्‍पष्‍ट केले.

राहुल गांधी अध्‍यक्षपद स्‍वीकारण्‍यास तयार

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २०२४च्‍या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्ष नवा चेहरा घेवूनच मैदानात उतरणार आहे. पक्षातील सूत्रांनी असा दावा केला आहे की, राहुल गांधी हे अध्‍यक्ष पद स्‍वीकारण्‍यास तयार झाले आहेत. आता त्‍यांच्‍या नावाची घोषणा करण्‍याची औपचारिकातच बाकी आहे.

राहुल गांधी यांनी अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला तर त्‍यांची बिनविरोधच निवड होईल. अध्‍यक्षपदासाठी निवडणूक झाली तरी राहुल गांधीच अध्‍यक्ष होतील, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले. ऑक्‍टोबर महिन्‍यात काँग्रेस कार्यकारणीची बैठकी झाली होती. यावेळी पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली होती.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news