कालीचरण बाबावर गुन्हा दाखल ; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून नौपाडा पोलिसात तक्रार - पुढारी

कालीचरण बाबावर गुन्हा दाखल ; मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून नौपाडा पोलिसात तक्रार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबाने महात्मा गांधी यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे पडसाद ठाण्यात देखील उमटले. राष्ट्रवादी नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

फॅसिजनविरुद्ध मैदानात उतरूनच लढावे लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मंत्री आव्हाड यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी भादवी 294, 505, 506, 34, 295(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण बाबाने महात्मा गांधीं यांच्याबाबत संतापजनक वक्तव्य केले होते. त्याच बरोबर विरोधात जातील त्यांना कापुन टाकेल असेही वक्तव्य केले होते. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. दरम्यान, या बाबा विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी कालीचरण बाबा विरोधात विविध पाच कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button