

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा
शेवगाव तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या लिबांच्या झाडाला कपाशी व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ३० रोजी उघड झाली. भाऊसाहेब सर्जेराव घनवट (वय २९) असे युवकाचे नाव असून तो बाभुळगाव येथील रहिवासी आहे.
पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास पाठविला व मृताच्या नातेवाईकाला खबर दिली.
दरम्यान, पहाटे गळफास घेतला असावा असा पोलिसांच्या अंदाज आहे. शेवगाव एस. टी. आगारात चालकाने फाशी घेतल्याची घटना ताजी असताना महिनाभरात तहसील कार्यालयासमोर व्यापार्याने फाशी घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.