घरात सापडल्या दोन तलवारी, गुप्ती; दोघांविरुध्द गुन्हा | पुढारी

घरात सापडल्या दोन तलवारी, गुप्ती; दोघांविरुध्द गुन्हा

नगर; पुढारी वृत्तसेवा : स्टेशन रस्त्यावरील मातोश्री कॉलनीमध्ये एका घरामध्ये छापा घालून कोतवाली पोलिसांनी तलवारी, गुप्ती अशी धारदार शस्त्रे जप्त केली. त्यात दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. तुषार अर्जुन हरेल (वय 27), अर्जुन विष्णू हरेल (वय 63) (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड नगर) असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी, 2 नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, रेल्वे स्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये एका घरामध्ये अवैधरित्या शस्त्रे ठेवण्यात आली आहेत.

त्यानुसार कोतवाली पोलिसांनी स्टेशन रस्त्यावरील मातोश्री कॉलनीमध्ये छापा घातला असता घरामध्ये बेडखाली दोन तलवारी व एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा

Ladies Purses: पर्स नीटनेटकी, सुटसुटीत कशी ठेवावी? जाणून घ्या सविस्तर

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Aparna Kanekar : साथ निभाना साथिया फेम अपर्णा काणेकर यांचे निधन

Back to top button