

बावडा; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा (ता.इंदापूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रविवारी (दि.5) सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील या कुटुंबातील सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
बावडा ग्रामपंचायतीसाठी 10270 मतदार आहेत. या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद व सदस्यांच्या 17 जागांसाठी मतदान होत असून, या सर्व जागी भाजपप्रणित पॅनलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी हर्षवर्धन पाटील व्यक्त केला. इंदापूर तालुक्यात बावडा तसेच वकीलवस्ती शेळगाव, शिंदेवाडी, काझड, अकोला या 6 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून, मतमोजणी सोमवार दि. 6 रोजी इंदापूर येथे होईल.
हेही वाचा