Ladies Purses: पर्स नीटनेटकी, सुटसुटीत कशी ठेवावी? जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Ladies Purses: पर्स नीटनेटकी, सुटसुटीत कशी ठेवावी? जाणून घ्या सविस्तर

पर्स म्हटले की हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय येतो. कितीही चांगली पर्स असली तरी दुकानामध्ये किंवा बाहेर कुठेही खरेदीला गेले तर पर्सची खरेदी आवर्जून केली जातेे. फार पूर्वीच्या काळापासून पर्सचा वापर पैसे आणि गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी केला जात असे; पण हल्ली पर्स म्हणजे झोळी झाली आहे. त्यात पैशांच्या व्यतिरिक्त मेकअपचे सामान, लिपस्टिक, फौंडेशन, परफ्यूम, कानातील झुमके, कंगवा, रूमाल, पुस्तके लंचबॉक्स आणि पाण्याची बाटलीसुद्धा असते. (Ladies Purses)

काही स्त्रियांच्या पर्सची अवस्था डस्टबीनसाखी असते. ज्यात कचरा तर टाकला जातो; पण तो बाहेर निघत नाही. काहींच्या पर्समध्ये चॉकलेटसोबत बर्गर, पॅटीस आणि समोसेसुद्धा असतात. पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने त्याचे वजन तर वाढतेच; पण त्याचबरोबर ती जड पर्स उचलल्याने दुखणे लागण्याची शक्यता असते. (Ladies Purses)

Ladies Purses: रेक्झिनऐवजी लेदर किंवा जूटची पर्स वापरावी

एका आदर्श पर्समध्ये एक नोटबुक, व्हिजिटिंग कार्डस् आणि एक लहान टेलिफोन डायरी, 2 स्वच्छ रूमाल, काही जरुरी औषधे, लिपस्टिक, कंगवा, 2 पेन आणि गरजेप्रमाणे पैसे एवढे असायला हवे. लंचबॉक्स आणि पाण्याची बाटली पर्समध्ये ठेवू नये.
पर्स फार मोठी असू नये वा फार लहानही नको. ज्या उद्देशासाठी पर्स घेता, त्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पर्स सुंदर, स्वस्त आणि मजबूत असावी. रेक्झिनच्या ऐवजी लेदर किंवा जूटची पर्स वापरावी. पर्समध्ये गरजेप्रमाणे पॉकेटस् असावीत. पर्समध्ये फालतू व वजनी सामान ठेवणे टाळावे. वेळोवेळी पर्सची स्वच्छता केली पाहिजे आणि त्यात ठेवलेल्या बिनउपयोगी वस्तू काढून टाकल्या पाहिजेत. त्यामुळे तुमची पर्स ही आकर्षक राहील आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणखीनच भर घालेल. (Ladies Purses)

हेही वाचा:

Back to top button