Nagar : निळवंडेच्या 182 लाभधारक गावांचे ग्रामस्थ करणार उपोषण

Nagar : निळवंडेच्या 182 लाभधारक गावांचे ग्रामस्थ करणार उपोषण

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील तांभेरे येथील जय श्रीराम मंदिरासमोर निळवंडे कालव्यासंदर्भातील विविध मागण्यांसाठी 182 गावांतील लाभार्थी ग्रामस्थ एकत्र येवून 2 ऑक्टोंबर (महात्मा गांधी जयंती) दिनी उपोषणास प्रारंभ करणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. निळवंडे कालव्यासाठी दादासाहेब पवार व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, पाटबंधारे विभाग, महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये निळवंडे उजवा व डाव्या कालव्याची कामे तत्काळ पूर्ण करून लाभधारक शेतकर्‍यांना शेतात पाणी द्यावे. प्रस्तावित कालव्यांमध्ये येणार्‍या अडचणी (वन विभाग) व इतर विभागांच्या मंजुरी शासनाने आपल्या स्तरावर सोडवणे.

संबंधित बातम्या : 

डाव्या आणि उजव्या कालव्यांवरील पुच्छ कालवे ओपन स्वरूपाचेच व्हावेत, (दि. 24 फेब्रुवारी 2022) रोजी दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात यावा, बंद पाईप कालवे रद्द करण्यात यावे, निळवंडे धरणावर 182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षण करावे, चारी व पोट चारी याही ओपन पद्धतीनेच कराव्या. (दि. 17 जानेवारी 2020) च्या कार्यकारी अभियंता यांच्या पत्रान्वये या कालव्यांची कामे सन 2022-23 पर्यंत पूर्ण करून सिंचन क्षमतेची निर्मिती करण्यात येत आहे, असे लेखी आश्वासन देण्यात आले होते, परंतु आजतागायत यावर कोणतीच कारवाई झाली नाही. यामध्ये शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे यात दोषी असणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून निळवंडे पाण्याचे चातकाप्रमाणे वाट बघणार्‍या शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेमुळे निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी घेण्यात आली व निळवंडेच्या उजव्या कालव्याची कामे जाणीवपूर्वक रखडवली आहेत. यामागील राजकारण शेतकरी जाणत आहेत. ते या दुराग्रही वागणुकीबाबत अनभिज्ञ नाहीत. मागील महाविकास आघाडी शासन काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन ही कामे जोरात सुरू होती, परंतु सत्ता बदल होताच कामे संथ गतीने होत आहेत. केवळ आश्वासन दाखवून दिशाभूल सुरू आहे. शेतकर्‍यांवर अन्याय करणारे पाटबंधारे खात्याचे नियोजन किती ढिसाळ आहे, हे अकोले तालुक्यात शेतामध्ये पाणी गेल्यानंतर लक्षात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राज्यकर्त्यांकडून कालव्याच्या प्रश्नाला बगल..!
राज्यकर्ते स्वार्थासाठी निळवंडे कालव्याच्या प्रश्नाला बगल देत आहेत. एकीकडे शेतकर्‍यांना पाणी देणार असल्याचे आश्वासन द्यायचे तर दुसरीकडे कालव्याचे काम ठप्प करीत श्रेय मिळविण्याचे प्रयत्न शेतकरी सहन करणार नसल्याचे सांगत, कालव्यासाठी शेतकर्‍यांनी तांभेरे येथे 2 ऑक्टोंबर रोजी एकत्र यावे, असे दादासाहेब पवार यांनी म्हटले आहे. राज्यकर्त्यांकडून कालव्याच्या प्रश्नाला बगल..!
राज्यकर्ते स्वार्थासाठी निळवंडे कालव्याच्या प्रश्नाला बगल देत आहेत. एकीकडे शेतकर्‍यांना पाणी देणार असल्याचे आश्वासन द्यायचे तर दुसरीकडे कालव्याचे काम ठप्प करीत श्रेय मिळविण्याचे प्रयत्न शेतकरी सहन करणार नसल्याचे सांगत, कालव्यासाठी शेतकर्‍यांनी तांभेरे येथे 2 ऑक्टोंबर रोजी एकत्र यावे, असे दादासाहेब पवार यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news