Crime news : संगमनेर हत्याप्रकरणी पत्नीसह तिघे गजाआड | पुढारी

Crime news : संगमनेर हत्याप्रकरणी पत्नीसह तिघे गजाआड

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : प्रियकराच्या मदतीने पतीची कोयत्याने गळा चिरून हत्या करणार्‍या पत्नीला संगमनेर शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात, तर अन्य दोघांना सहा दिवसांत अटक केली. कोयाताही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली दीपाली मारूती डामसे (रा.संगमनेर खुर्द), रमेश तुकाराम भले (रा.येणेरे, ता.जुन्नर, जि.पुणे) आणि गणेश बाळशीराम भालेकर (रा. काटेडे, ता.जुन्नर, जि.पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. जुन्नर तालुक्यातील कोपरी येथील मारूती आबा डामसे याने नातेवाईक असलेल्या दीपाली हिला संगमनेर खुर्द येथे पळवून आणून तिच्याशी लग्न केले.

संबंधित बातम्या :

मात्र, त्यांच्यात वाद होऊ लागल्याने तिने मारूती डामसे याचा काटा काढण्याचे ठरविले. तिच्या सांगण्यावरून तिचा प्रियकर रमेश तुकाराम भले याने 15 सप्टेंबरला म्हसोबा मंदिराजवळ लोखंडी कोयत्याने गळा कापून मारूती डामसे यांची हत्या केली. त्यानंतर दोघांनी त्यांचा मृतदेह प्रवरा नदीपात्रात टाकून दिला. तर, कोयता चंदनपुरी घाटात फेकून दिला. याबाबत मारूती डामसे यांचा भाऊ पांडुरंग यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसात पत्नी दीपालीसह दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांची तीन पथके तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला. अवघ्या 24 तासात दीपाली हिला पारनेर तालुक्यातील आळकुटी येथून अटक केली. तिने साथीदार रमेश भले याने कोयत्याने गळा कापून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सहा दिवसांमध्ये पोलिसांनी रमेश भले व गणेश भालेकर या दोघांनाही अवघ्या सहा दिवसांत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button