Nagar News : जिल्हा बँकेच्या कारभाराची ईडी चौकशी करा : आमदार तनपुरे

Nagar News : जिल्हा बँकेच्या कारभाराची ईडी चौकशी करा : आमदार तनपुरे

राहुरी : पुढारी वृत्तसेवा:  भाजप पक्ष विरोधकांना संपविण्यासाठी ईडी-सीबीआयचा परिपूर्ण वापर करीत विरोधक संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप स्वतःला धुतलेल्या तांदळाचा समजत असेल तर जिल्हा बँकेच्या कारभाराची ईडी चौकशी करून दाखवाच. नव्या अध्यक्ष काळात जिल्हा बँक कारभाराची सखोल चौकशी झाल्यास बरेच काळेभेरे बाहेर पडेल, अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे 90 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. तनपुरे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी मोकाटे गुरूजी हे होते. आ. तनपुरे यांनी राज्य शासनाच्या कारभारावर सडकून टीका साधली. गतीमान शासनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना पायदळी घेतले. अनेक विकासकामांना स्थगिती दिली. उच्च न्यायालयात लढा दिला. न्यायालयातून न्याय मिळाला तरीही गेंड्याचे कातडे पांघरलेल्या राज्य शासनाला जाग आली नाही. प्रशासनातील अधिकार्‍यांवर दबाव टाकून कामे थांबविण्याचा प्रयत्न झाला. परंतु जनतेच्या रेट्यातून बहुतांश कामांना कार्यारंभ मिळविण्यात यश आले. ब्राम्हणी गावाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे समाधान आहे. काही अधिकारी हे टक्केवारीसाठी कामे अडवित आहेत. त्यांचा आमच्या सत्ता काळात नक्कीच बंदोबस्त करू. नगर-
मी राज्यमंत्री असताना उर्जा खात्याच्या माध्यमातून एसीएफ योजना आणली होती.

त्या योजनेत 2 हजार कोटी रुपयांचा निधी उभारला. त्या योजनेतून उर्जा क्षेत्राला पायाभूत करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. परंतु राज्यात चुकीच्या मार्गाने अवतरलेल्या शिंदे-फडणवीस शासनाने एका अधिकार्‍याच्या चुकीच्या मार्गदर्शनावर एसीएफ फंडातील रक्कमेवर थांबा देऊन योजना बंद करून टाकली. 2 हजार कोटींच्या एसीएफ योजनेबाबत मंत्रालयात प्रश्न उपस्थित केला. परंतु त्याबाबतही सध्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत आपणास घेणेदेणे नसल्याचे दाखवून दिले, असे आ. तनपुरे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचा कारभार हाती घेतलेले नव्या अध्यक्षांनी पद मिळताच कोणतीही गरज नसताना 1 कोटी रूपये खर्च करून दोन वाहने खरेदी केले. जिल्हा बँकेत पद घेतल्यापासून अध्यक्ष जिल्हा बँक मालकीची झाल्याप्रमाणे वागत असल्याचे अनेक जिल्हा बँकेचे संचालक भेटून सांगतात. काही कारखान्यांना बोगस कर्ज वाटप करून बँकेचे नुकसान केले जात आहे. त्याची चौकशी झाल्यास खरे काय ते समोर येईल.

याप्रसंगी डॉ. राजेंद्र बानकर, विठ्ठल मोकाटे, भारत तारडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार महेश हापसे यांनी मानले. कार्यक्रभासाठी चंद्रभान राजदेव, सेवा संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब हापसे, शब्बीर शेख, सचिनराव ठुबे, रंगनाथ मोकाटे, शिवाजी राजदेव, बाळासाहेब देशमुख, माणिक तारडे, नामदेव म्हसे, वैभव जरे, शामराव हापसे, काका राजदेव, नंदकिशोर राजदेव, संजय पुंड, बाबासाहेब भवर, चंद्रकांत साठे, शिवकांत राजदेव उपस्थित होते.

आता महाविकास आघाडी स्वच्छ झाली
ईडी-सीबीआयच्या धाकाने शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्ष फुटला. काँग्रेस पक्षातील नेते निष्ठावान राहिली. वॉशिंग पावडर भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांमुळे महाविकास आघाडी स्वच्छ प्रतिमेची झाली आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी भाजपाला पराभवाची धूळ चारत सत्ता स्थापण करण्यासाठी महाविकास आघाडी पक्ष सक्षम असल्याचे आ. तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news