शिर्डी साईबाबांच्या मंदिरास दिला सोन्याचा मुलामा

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : देणगीदार साईभक्त बी. विजयकुमार व सी. वनजा हैद्राबाद यांचे देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदीराच्या कळसाचे आतील बाजुस सुवर्ण वज्रलेपाचे ( मुलामा ) काम पुर्ण झाल्याने आज श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी त्यांचा श्री साईबाबांची मुर्ती व विभुती देऊन सत्कार केला. देणगीदार साईभक्त बी. विजयकुमार यांनी सन-2007 मध्ये समाधी मंदीरावरील कळस व त्याभोवताली असलेले चार गोपुर यांनाही सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगी स्वरुपात केलेले आहे. यावर आता पुन्हा एक थर सुवर्ण वज्रलेप करण्याचे कामही करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
- काळजी घ्या ! रक्तदाब, मधुमेहासह मानसिक रुग्ण वाढले
- नगर जिल्ह्यातील 261 गावांची पैसेवारी कमी ; खरिपाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर
- Nagar crime news : तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
यापुर्वी सन 2006 मध्ये श्रींच्या समाधी मंदीरातील सोन्याच्या पादुका, सोन्याची झारी व फुलपात्र, सन 2008 मध्ये सोन्याची चिलीम, सन 2010 मध्ये गुरुस्थान मंदीराचे बाहेरील बाजुस सुवर्ण मुलामा, सन 2015 मध्ये श्री शनि मंदीर, श्री गणपती मंदीर व श्री महादेव मंदीर या तीनही मंदीराचे कळसांना सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगीदार बी. विजय कुमार यांचे देणगीतून केलेले आहे. मार्च 2023 मध्ये श्री साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, श्री व्दारकामाईचे चांदीचे सिंहासन व समाधी मंदीरातील शोरुमचे सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगीदार साईभक्त बी. विजय कुमार यांचे देणगीतून झालेले आहे. देणगीदार साईभक्तांच्या विनंतीवरुन देणगी मुल्य नमुद केलेले नाही.