नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने टीव्ही सेंटर ते गुलमोहरोड चौकापर्यंत पथदिवे उभे केले, पण त्यावर दिवेच बसविले नाहीत. गत वर्षभरापासून या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने नगरसेविका सोनाबाई शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी या खांबांवर मशाल व टेंभे लावून अंदोलन केले. आंदोलनात सतीश शिंदे, संतोष लोखंडे, प्रशांत वाघ, मनीष शिंदे, प्रमोद कुलकर्णी, ओंकार आरडे, कुणाल पडजाते, डॉ. म्हस्के, निलेश चिप्पा, सागर शिंदे, गणेश शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या :
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर अंधार
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्यावर पथदिव्यांसाठी खांब बसवले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे खांब उभे करण्यात आले आहेत. मात्र, त्यावर पथदिवे न बसवल्याने या रस्त्यावर संपूर्ण अंधार असतो. अंधारात छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच गणेशोत्सवाला अवघे 5 दिवस राहिलेले आहेत. उपनगरमधील गणेश विसर्जन मिरवणूक याच मार्गावरून काढली जाते. महापालिकेला याचे गांर्भीय नाही. जाणून बुजून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी खासगी कंपनी दिवे बसवत नसेल, तर नगरसेवक निधीतून ते बसवावेत. मात्र, गणेशोत्सवापूर्वी पथदिवे न बसवल्यास कोणत्याही तीव्र आंदोलन केले जाईल, तसेच कोणत्याही क्षणी अज्ञातस्थळी आत्मदहन आंदोलन केले जाईल.
– तायगा शिंदे, माजी नगरसेवक