पुणे : गणेशोत्सवासाठी पीएमपीकडून २७० जादा बसेस धावणार | पुढारी

पुणे : गणेशोत्सवासाठी पीएमपीकडून २७० जादा बसेस धावणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जादा बस गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये २७० जादा बस पुणेकरांना सेवा पुरवतील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहराबाहेरून व शहरांतर्गत नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्यामुळे बस गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या भागातून सुटणार ज्यादा बस….

1) निगडी – ७०
2) चिंचवडगाव – ३५
3) भोसरी – ६२
4) पिंपळे गुरव – २०
5) सांगवी – १५
6) आकुर्डी रेल्वे स्टेशन – १६
7) चिंचवडगाव मार्गे डांगे चौक – ३०
8) मुकाई चौक रावेत – १२
9) चिखली/संभाजीनगर – १०
एकूण – २७० बस

रात्री १० नंतर ५ रूपये जास्त आकारणार

दैनंदिन संचलन गणेशोत्सव कालावधीमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर बंद राहणार असून, त्यानंतर सर्व बस यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहतील. त्यामुळे यावेळी 5 रूपये जादा तिकीट दर आकारणी करण्यात येईल. तसेच, यावेळी रात्री 12 नंतर कुठल्याही प्रकारचे पास पीएमपीच्या बसमध्ये चालणार नाहीत. असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button