वाळकी : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या आठ जणांना आपापसात वाद घालू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांनी हॉटेल मालकासह तीन कामगारांना मारहाण केली. बुधवारी (दि. 13) दुपारी दोन वाजता बाराबाभळी (ता. नगर) येथील प्रकाश हॉटेलमध्ये ही घटना घडली. मारहाणीत हॉटेलमालक सुनील संभाजी गुंजाळ (वय 46, रा. भोपळे गल्ली, माळीवाडा) व कामगार शफीक उल इस्लाम, रज्जब अली, इझअर अलम (सर्व रा. इस्लामपूर, ता.जि. उत्तर दिनाशंपूर, पश्चिम बंगाल) जखमी झाले.
संबंधित बातम्या :
याप्रकरणी गुंजाळ यांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन शिंदे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) व अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार जी.डी.गोल्हार करीत आहेत.