Nagar news : तब्बल 150 मोठी वाहने चोरून विकली भंगारात | पुढारी

Nagar news : तब्बल 150 मोठी वाहने चोरून विकली भंगारात

नगर : पुढारी वृत्तसेवा :  एक नव्हे.. दोन नव्हे; तर तब्बल दीडशे मोठ्या वाहनांची चोरी करणार्‍या आणि भंगारात विकणार्‍या आरोपीला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगरमधून एक टेम्पो चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी माहिती काढून त्याला बुलडाणा जिल्ह्यात गाठले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. हर्षल भगवान गंगातीरी (वय 32, रा. दुसरबीड, जि. बुलडाणा) असे त्याचे नाव आहे. मोठी वाहने चोरणारे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

संबंधित बातम्या :

केडगाव परिसरातील हॉटेल रंगोलीजवळ बबन संभाजी मेहेत्रे (रा.केडगाव, नगर) यांनी आपला सहा लाखांचा टेम्पो उभा केला होता. मात्र, बुधवारी (दि.13) सकाळी टेम्पो गायब होता. टेम्पो चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यानी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटा टेम्पो घेऊन संभाजीनगरमार्गे जालन्याकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हा बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला चिखली पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व संग्राम पाटील, सहायक निरीक्षक गजाजन वाघ, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, बिल्ला इनामदार, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, संदीप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

हेही वाचा :

Back to top button