रत्नागिरी : कडवई चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला आठ महिन्यानंतर अटक | पुढारी

रत्नागिरी : कडवई चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला आठ महिन्यानंतर अटक

देवरुख, पुढारी वृत्तसेवा : कडवई येथील घरामध्ये चांदी, पितळ आणि तांब्याची जुनी भांडी चोरणाऱ्या संशयित आरोपीला आठ महिन्यानंतर पनवेल येथे संगमेश्वर पोलिसांनी पकडले आहे. कडवई येथील अंजुम मोडक यांनी १ जुलै रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात घरामधील तांबे, पितळीची जुनी भांडी अशी सुमारे दहा हजार सहाशे रुपये किमतीची चोरी झाल्याचे संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

यामधील संशयित आरोपी सादिक हसन काझी (वय ४५वर्ष) हा गेले आठ महिने नजरेआड होता. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस नाईक बरगाले ,मनवल यांनी तपास करीत आरोपीला कल्याण, उल्हासनगर, खारघर पनवेल परिसरातून शोध घेऊन पकडला आहे. संशयित आरोपी सादिक हसन काझी याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button