धुळे : दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीची साक्री पोलिसांकडून उकल | पुढारी

धुळे : दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीची साक्री पोलिसांकडून उकल

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा साक्री पोलिसांनी छडा लावला असून चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.  साक्री शहरातील रामजीनगर भागात (दि.27) जुलै रोजी चोरी झाली होती.

साक्रीतच राहणाऱ्या चोरट्यांनी रामजी नगरात राहणाऱ्या गिता केशव जगताप या महिलेच्या घरावर पाळत ठेवून दशामातेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती महिला गेली असता चोरट्यांनी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून 26 हजार रुपयांचे सोने व दीड लाख रुपये रोकड असा एकूण 1 लाख 76 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता.  महिलेने चोरीची फिर्याद साक्री पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर संशयित म्हणून सदर आरोपींना ताब्यात घेतले होते. परंतु त्यावेळी सबळ पुरावा नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले. मात्र त्यांच्यावर गुप्त रीतीने साक्री पोलिसांनी पाळत ठेवून  मुद्देमालासह तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले.

याप्रकरणी रुपेश रवींद्र पवार, पवन प्रकाश जाधव, सुलतान नवरा शहा, शशिकांत त्र्यंबक साळुंखे, विकी गुलचंद भवरे, उमेश दीपक बाबर यांच्याकडून चोरी गेलेल्या 1 लाख 76 हजार रुपयाच्या मुद्देमालापैकी 16 हजार रुपये किमतीचे 7.6 ग्रॅम वजनाचे सोने व 24 हजार रुपये रोकड अशा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीची साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, सपोनि.रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, पोलीस कॉन्स्टेबल चेतन गोसावी, तुषार जाधव, मयूर चौधरी, धुळे एलसीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील यांच्या टीमने चोरी उघडकीस आणली असून आरोपींना अटक केली आहे. या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button