अहमदनगर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलवर मिटकेंचा छापा, एकजण ताब्यात

अहमदनगर : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलवर मिटकेंचा छापा, एकजण ताब्यात

कोल्हार(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणार्‍या नगर-मनमाड राज्य मार्गालगत बाभळेश्वरनजीक हॉटेल साईप्रसादवर डिवायएसपी संदीप मिटके यांनी छापा टाकून एका परप्रांतीय युवतीची सुटका केली. याप्रकरणी दीपक बाबासाहेब थोरात याला ताब्यात घेतले आहे. हॉटेल साईप्रसादमध्ये बनावट ग्राहक पाठवून डिवायएसपी मिटके यांनी पोलिसांसह छापा टाकला. या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दीपक थोरात याने पश्चिम बंगालून मुंबईला आलेल्या एका मुलीला वेश्या व्यवसाय करण्याच्या हेतूने हॉटेल साईप्रसाद आणले होते. अनेक दिवसांपासून हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. ही माहिती मिळताच बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकून युवतीची सुटका करुन, आरोपीला ताब्यात घेतले आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 च्या कलमांन्वय्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे बाभळेश्वर परिसरात अवैध धंदे करणार्‍या हॉटेलच्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news