कांदा अनुदानाचे 66 कोटी 88 लाख रुपये वितरित

कांदा अनुदानाचे 66 कोटी 88 लाख रुपये वितरित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील एकूण 26 हजार 208 कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर सुमारे 66 कोटी 88 लाख 27 हजार 425 रुपयांइतके अनुदान बुधवारपासून (दि.6) जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान जमा होत असून, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील 8 बाजार समित्यांमधील शेतकर्‍यांचा समावेश असल्याची माहिती पणन संचालनालयातून देण्यात आली.

राज्य सरकारच्या वतीने बुधवारी (दि. 6) पहिल्या टप्प्यातील कांदा अनुदान वाटपात तीन लाख शेतकर्‍यांना 300 कोटी अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्र्यांच्या उपस्थित सुरुवात झाली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारने दिनांक 1 फेब—ुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकर्‍यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तर 10 हजार रुपयांपेक्षा अधिक अनुदान असलेल्या शेतकर्‍यांना त्यांची पुढील रक्कम दुसर्‍या टप्प्यात दिली जाणार असल्याची माहिती पणन संचालनालयातील अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, हवेली तथा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा विक्रीपोटीच्या अनुदानाची सर्वाधिक रक्कम 28 कोटी 37 लाख 35 हजार 707 इतकी आहे. तर त्यामध्ये 11 हजार 262 शेतकर्‍यांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत अनुदानाची संपूर्ण रक्कम जमा होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कांदा अनुदान वितरणातील बाजार समित्या, शेतकरी संख्या व अनुदान रक्कम
तालुका ः खरेदी केंद्राचे नाव ः पात्र लाभार्थी ः अनुदान रक्कम
दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती : 304 ः 4987832.50
बारामती : बारामती कृ.उ.बा.समिती : 272 ः 3554001.50
शिरूर : शिरूर कृ.उ.बा.समिती : 1894 ः 35210056.50
आंबेगाव : आंबेगाव कृ.उ.बा.समिती : 4871 ः 159811543.00
खेड : खेड कृ.उ.बा.समिती : 2967 ः 69849143.00
जुन्नर : जुन्नर कृ.उ.बा.समिती : 4562 ः 110475561.00
इंदापूर : इंदापूर कृ.उ.बा.समिती : 76 ः 1203580.00
हवेली : हवेली कृ.उ.बा.समिती : 11262 ः 283735707.85
एकूण : 8 बाजार समित्या : 26,208 ः 66,88,27,425.35

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news