नवर्‍याने पळ काढला अन् लग्नासाठी सासरा पुढे आला

नवर्‍याने पळ काढला अन् लग्नासाठी सासरा पुढे आला
Published on
Updated on

जकार्ता ः लग्न लागण्यासाठी काही मिनिटे शिल्लक होती. दोन्हीकडील मंडळींच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता; पण अचानकपणे नवरदेव लग्न मंडपातून पळून गेला. त्यामुळे वधूकडील नातेवाईकांना मोठा धक्का बसला. त्याचवेळी मुलाचे वडील पुढे आले आणि त्यांनी आपण भावी सुनेशी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

इंडोनेशियन मीडिया आऊटलेटसनुसार, ही तरुणी जिकोटामो गावातील आहे. नवर्‍या मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाच्या दिवशीच त्याने पळ काढला. या लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी मोठा खर्चही केला होता. हा पैसा वाया जाऊ नये, यासाठी त्या तरुणाचे वडील लग्नासाठी तयार झाले होते. इंडोनेशियामध्ये सोशल मीडियावर या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवरी आणि तिचा सासरा विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. यानंतर नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत असून, संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेक जण या लग्नाची खिल्ली उडवत असून, काही जण या मुलीच्या नशिबावर दु:ख व्यक्त करत आहेत. काही जण सासर्‍याच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news