अहमदनगर : एसपींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट | पुढारी

अहमदनगर : एसपींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावाने बनावट फेसबूक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अकाउंट वरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली असून, कारणे सांगून पैशांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, अकाउंट तयार करणार्‍या आरोपींची माहिती फेसबूक कडून मागविण्यात आली आहे.

ओला यांनी त्यांच्या मूळ फेसबूक अकाउंट वरून बनावट अकाउंट वरून आलेल्या मेसेजला कोणताही प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सायबर भामट्यांकडून आयएस, आयपीएस अधिकार्‍यांना टार्गेट केले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी जि. प.चे सीईओ आशिष येरेकर, मनपा आयुक्त पंकज जावळे यांचेही बनावट फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करण्यात आले होते. आता पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या नावाने फेसबूक अकाउंट उघडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात

Rainfall Activity: महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

ऑस्ट्रेलियात फ्रेममागे आढळला कार्पेट अजगर

Back to top button