अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात | पुढारी

अहमदनगर बाजार समितीमध्ये भाजी बाजाराला होणार सुरुवात

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्येे 31 ऑगस्टपासून दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत भाजीपाला, फळे व फुले यांचा बाजार सुरू राहणार आहे. भाजीपाला, फळे, फुले असोसिएशन यांच्या मागणीनुसार संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली उत्पन्न बाजार समिती शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला मुंबई, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, पुणे व इतरही ठिकाणच्या बाजारपेठा जलदगतीने उपलब्ध होऊन शेतीमाल पाठविणे शक्य होईल. बाजारभावही चांगला मिळेल. शेतकरी दिवसभर आपल्या शेतमालाची काढणी करतात. पण, ताजा माल पहाटे आणणे अनेकदा जिकरीचे होते. तोपर्यंत शेतीमाल सुकला जातो. त्यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. परंतु, आता सायंकाळी भाजीपाला, फळे व फुले मार्केट सुरू राहणार असल्याने, शेतकर्‍यांना आपला ताजा शेतमाल सायंकाळी विक्री करणे आणि व्यापार्‍यांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.

बाजाराचे उदघाटन 31 ऑगस्ट रोजी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सर्व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांनी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ व संचालक मंडळाने केले आहे.

हेही वाचा

नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

मदुराई रेल्वे यार्डात खासगी डब्याला आग; उत्तर प्रदेशातील 10 प्रवाशांचा मृत्यू

Great pyramid : संशोधकांना खुणावतोय ग्रेट पिरॅमिडमधील खजिना!

Back to top button