नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

नेवाशात पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडला असून, पावसाची प्रतीक्षा पाहून शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी काही उपाययोजना सूचविल्या आहेत. खरीप बाजरी, सोयाबीन, कपाशी, मका व तूर पिकांची तालुक्यात पेरणी झाली आहे. उशिरा आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी तातडीने पेरणी पूर्ण केली. त्यानंतर रिमझिम पाऊस पडला. तथापि जोरदार पाऊस झाला नाही. रिमझिम पावसावर पिके तग धरून होती. तथापि आता पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.

ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. त्यांनी नियोजन करावे. कारण एक पाण्याअभावी पिके उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. संरक्षित पाणी देताना काळजी घ्यावी. विशेषतःसरी आड सरी भिजवावी तसेच उंचीवरच्या बाजूने दोन तृतीयांश सरी भिजवावी. म्हणजे उर्वरित कोरडी राहिलेली एक तृतीयांश सरी पाझर जाऊन ओली होऊ शकते. पिकांच्या पानावाटे बाष्पीभवनाद्वारे पाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी बाष्पविरोधक केओलीन नावाचे औषध फवारावे केओलीन पावडर स्वस्त आहे.

आठ किलोकेओलीन 100 लिटर पाण्यात मिसळून विविध प्रकारच्या पिकावर फवारणी करता येते. सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता सोयाबीनचे पीक फुलोर्‍यात आहे. पाण्याचा ताण बसल्यामुळे फूलगळ होऊ नये, यासाठी प्लॅनोफिक्सची शंभर पीपीएम फवारणी करावी.तसेच ज्या शेतकर्‍यांना शक्य असेल त्यांनी तीन किलो एरिया 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ हवामानामुळे कपाशीवर मावा व तुडतुडे, तसेच सोयाबीनवर काही ठिकाणी येलो मजाक व मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी कीडनाशकाची फवारणी करावी. विशेषतः शेतात पाण्याच्या नियोजनासाठी कमीत कमी पाणी जास्तीत जास्त पिकावर वापर करण्यासाठी स्प्रिंकलर या आधुनिक पद्धतीचा वापर करावा, अशा काही उपाययोजना डॉ. ढगे यांनी सूचविल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news