गंगागिरी महाराज सप्ताहासाठी लोणी बु.च्या 10 पोते भाकरी

गंगागिरी महाराज सप्ताहासाठी लोणी बु.च्या 10 पोते भाकरी

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वैजापूर येथीलयोगीराज गंगागिरी महाराज यांच्या 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी लोणी बुद्रुक गावाच्या वतीने शनिवारी 10 पोत्यांच्या भाकरी व आमटीसाठी 25 हजारांची रोख रक्कम सप्ताह आयोजन कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., खा. डॉ. सुजय विखे पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाला भरभरून मदत केली. सकाळी श्रीराम मंदिर परिसरातून भाकरी घेऊन गावकर्‍यांनी सप्ताहास्थळाकडे प्रस्थान केले.

माजी मंत्री म्हस्के पा. यांच्या उपस्थितीत हरिनामाचा जयघोष करीत शेकडो ग्रामस्थ सप्ताहास रवाना झाले. शनिवारी सकाळपासूनच ग्रामस्थांनी भाकरी जमा करण्यास गर्दी केली होती. सुमारे पोत्यांच्या भाकरी यावेळी जमा झाल्या. आमटीसाठी 25 हजार रोख रक्कमही जमा झाली. भजनी मंडळ आणि गावकरी तीन बसेसमधून सप्ताहाकडे रवाना झाले.

यावेळी किसनराव विखे, अशोकराव धावणे, अनिल विखे, मुरलीधर विखे, म्हसू विखे, कचरू विखे, गणेश विखे, नाना म्हस्के, राहुल धावणे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, प्रवीण विखे, नवनाथ विखे, गणेश विखे, दादासाहेब म्हस्के, भाऊसाहेब विखे, राम विखे, दत्तात्रय विखे, बाबासाहेब विखे, किशोर धावणे, रवींद्र धावणे, विनायक विखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news