पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात; कोळगावात दुष्काळाचे सावट | पुढारी

पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात; कोळगावात दुष्काळाचे सावट

कोळगाव(अहमदनगर);  पुढारी वृत्तसेवा : कोळगाव परिसरात अद्यापि जोरदार पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. मूग, बाजरी, तूर, सोयाबीन, उडीद ही पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस व इतर पिकांची पेरणी केली. खते, औषधे, बी बियाणे, तणनाशके, मशागत यावर मोठा खर्च केला. रिमझिम पावसावर शेतकरी आशेने पिकांच्या वाढीची आशा बाळगून आहे.

परंतु हवामान विभागाने दिलेल्या इशार्‍यानुसार पुढील पंधरा दिवसांत पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. मोठा आर्थिक खर्च करूनही उत्पादन हातात न पडल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. अद्यापि परिसरात जोरदारपाऊस नसल्याने नदी-नाले व उद्भव कोरडेच आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नी गंभीर होत चालला आहे.

शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे

पावसाअभावी पिके करपू लागली. चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी नाही, अशा अवस्थेत शेतकरी आभाळाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे.

हेही वाचा

नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा मोर्चा

1 हजार किलो गोमांस पकडले; संगमनेर पोलिसांची कारवाई

नेवासा : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या : आमदार गडाख

Back to top button