1 हजार किलो गोमांस पकडले; संगमनेर पोलिसांची कारवाई | पुढारी

1 हजार किलो गोमांस पकडले; संगमनेर पोलिसांची कारवाई

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नाशिक- पुणे महामार्गावर तालुक्यातील कर्‍हे घाटातील परिसरात शुक्रवारी रात्री एका संशयास्पद वाहनातून मुंबईच्या दिशेने जाणारे गोमांस घेवून जाणारे वाहन तालुका पोलिसांनी पकडले असून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी कर्‍हे घाट परिसरात सापळा लावला. एका टाटा कंपनीच्या एमएच 04 एचवाय 4082 टाटा कंपनीची कार वाहनासह तब्बल साडेसहा लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला . यात अडीच लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांस व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी (वय 28 वर्ष, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) आणि असलान अस्लम कुरेशी (वय 22 वर्ष, रा. अल्ताफ बिल्डिंग, कब्रस्तान रोड, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील कत्तल केलेले गोवंश जनावरांचे गोमांस वाहतूक करताना आढळून आल्याने पहाटे तीन वाजता संगमनेर तालुका पोलिसांनी मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी आणि असलान अस्लम कुरेशी या दोघा जणांविरोधात पोलिस शिपाई बाबासाहेब केशव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

नाशिक : बळकावलेल्या जमिनी परत करा, इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा मोर्चा

नेवासा : कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या : आमदार गडाख

नाशिककरांनो काळजी घ्या! शहराभोवती वाढतोय डेंग्यूचा विळखा

Back to top button